लातुर जिल्हयातील 95 व्यक्तीच्या स्वाबपैकी 87 निगेटीव्ह, 2 पॉझिटीव्ह व 6 प्रलंबित

लातुर जिल्हयातील 95 व्यक्तीच्या स्वाबपैकी 87 निगेटीव्ह, 2 पॉझिटीव्ह व 6 प्रलंबित


लातूर,:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 21.05.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 95 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते व त्यातील 27 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. पॉझिटीव्ह अहवाल आलेला व्यक्ती 65 वर्षाचा असुन तो नाकाच्या ऑपरेशनसाठी या रुग्णालयात दाखल झाला होता. ऑपरेशन करण्यापूर्वी त्या व्यक्तीला होल्डींग वार्ड मध्ये ठेवून त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असुन त्याची प्रकृती स्थित आहे. तो मागील 8 दिवसापूर्वी बिदर येथुन आला असुन सदर व्यक्ती लेबर कॉलनी येथील आहे.


  उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 36 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. चाकुर येथुन 02 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 


कासारशिरसी येथील 06 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असुन त्यापैकी 4 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आले आहेत. 


मुरुड येथील 07 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 


अहमदपुर येथील 09 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.


स्त्री रुग्णालय, लातुर येथील 6 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, असे लातुर जिल्हयातील असे एकुण 95 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 87 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व 6 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


 


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज