उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन

उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन


उदगीर: रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल तर्फे 10 वी, 12वी, पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान रोटरी करिअर फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले आहे.


पाच दिवशीय करिअर फेस्टिव्हल मध्ये आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, अविनाश धर्माधिकारी, संदीपजी पाठक, उदय निरगुडकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. हा कार्यक्रम दररोज सायंकाळी 4 ते 7 या काळात चालणार आहे.


या पाच दिवसीय कार्यक्रमा मध्ये विज्ञान, वाणिज्य, कला, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता, अश्या विविध क्षेत्रा विषयी माहिती मिळणार असून हा कार्यक्रम आपण rotary club udgir ह्या facebook पेज वर पाहता येणार आहे.


विद्यार्थ्यांनी https://forms.gle KyK4qNixFEDTpbR19 या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन


असे आवाहन रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष रो.विशाल तोंडचिरकर, सचिव रो. किर्ती कांबळे, प्रोजेक्ट चेअरमन रो. प्रशांत मांगुळकर यांनी केले आहे.


Popular posts
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image
सरदार वल्लभभाई पटेल शाळेत लॉयनेस क्लब गोल्डच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
Image
कृषी विधेयक स्थगिती अध्यादेशाची उदगीरात भाजपाकडून होळी
Image
*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी*
Image
स्त्रियांचा सन्मान करणारेच खरे शिवरायांचे अनुयायी : दिशा पिंकी शेख उदगीर : छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणवून घेणा-यांची संख्या कमी नाही परंतु स्त्रियांचा सन्मान करणारेच ख-या अर्थाने शिवरायांचे अनुयायी असू शकतात असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले. उदगीर येथील सार्वजनीक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नगर परिषदेसमोरील प्रांगणात दिशा पिंकी शेख यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील अठरा पगड जातींना सोबत घेवून स्वराज्याचे स्वप्न पाहीले व ते पूर्ण केले. आज समाजात जाती जातीत, धर्माधर्मात भेद करणारी मंडळी वाढत आहे. जाती धर्माच्या पलीकउे जावून देशाच विचार करणाराच खरा देशभक्त असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार चालविताना आपल्या आईचा सन्मान करून समस्त स्त्री जातीचा सन्मान केला असल्याचे सांगितले. आज मात्र आपली आई, बहीण, मुलगी, पुरूषी वर्चस्वाखाली दबून छळली जात आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वरचेवरवाढत चालले आहे. महिलंाना अजूनही वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही अशी खंत व्यक्त करीत जोपर्यंत स्त्रीयांची वैचारिक गुलामगिरी संपणार नाही तोपर्यंत हा शिवरायाचा महाराष्ट्र होणार नाही असे शेख यावेळी म्हणाल्या. सार्वजनीक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दोन दिवस कलामहोत्सव पार पडले. या कलामहोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वियज निटूरे व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नरेंद्र कठारे, नीता मोरे, काजोल मिरजगावे, संगीता नेत्रगावे, स्वप्नील पकोळे, सुनील कोळी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीता मोरे यांनी केले. पाहूण्यांचा परिचय अनिता यलमटे यांनी करून दिला.
Image