वाळवंटी टोळधाड संदर्भात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी शेतकऱ्यांनी किडीला घाबरून जावू नये : राहुल केंद्रे

वाळवंटी टोळधाड संदर्भात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी


शेतकऱ्यांनी किडीला घाबरून जावू नये : राहुल केंद्रे


लातूर : वाळवंटी टोळधाड ही कीड सध्या अमरावती,नागपूर व वर्धा जिल्ह्यात दिसून आली असून ती भंडारा जिल्ह्याकडे सरकलेली आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात येण्याची शक्यता कमी असली तरी जिल्हा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यावर लक्ष ठेवूण आहे. या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस कृषी सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती श्री.वाघमारे, जिल्हा परिषद कृषी समिती सदस्य महेश पाटील, कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र डॉ.भामरे ,कृषी विद्यावेता डॉ.सूर्यवंशी, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन डिग्रसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्र्य गवसाने, कृषी विकास अधिकारी एस.आर.चोले, उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थकर, उपस्थित होते.


या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यात सध्या आलेल्या वाळवंटी टोळधाडीच्या प्रादुर्भावाबाबत आणि संभाव्य उपाय योजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हयातील शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या किडने आपल्या शेतात प्रवेश करू नये याकरीता पुढाीलप्रमाणे उपाय योजना सुचविण्यात आल्या.


शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदने तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवज करणे इत्यादीचा समावेश आहे. संध्याकाळी/रात्रीच्या वेळी झाडाझुडपावर टोळ जमा होतात. अशा वेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धुर करावा. प्रतिबंधात्क उपाय म्हणून लिंबोळी आधारित कीटकनाशक अझाडिरेक्टीन 1500 पी. पी.एम.30 मी.लि., किंवा 5 टक्के लिंबोळी अर्काची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी. गहु किंवा भाताच्या 20 किलो तुसामध्ये फिप्रोनिल 5 एस.सी.3 मि.ली. मिसळून त्याचे ढिग शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. मिथील पॅराथिऑन 2 टक्के भुकटी 25 ते 30 किलो प्रती हेक्टरी धुरळणी करावी. टोळाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणत असल्यास क्लोरपारिफॉस 20 ई.सी 24 मी.ली. किंवा क्लोरपारीफॉस 50 ई.सी. 10 मीली किंवा डेल्टामिथ्रीन 2.8 ई.सी. 10 मीली किंवा फिप्रोनिल 5 एस.सी. 2.5 मीली किंवा लेम्डासायहॅलोर्थीन 5 ई.सी. 10 मीली किंवा मेलॅथिऑन 50 ई.सी. 37 मीली.प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवाीरणी करावी. फवारणी शक्तोरात्री उशीरा किंवा पहाटेच्या वेळी करावी. योवळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने जमा झालेले असतात. त्यावर फावरणी केल्यास नियंत्रण मिळविणे शक्य होते.


तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ही कीड दिसून आल्यास या उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे ,कृषी सभापती गोविंद चिलुरे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. गावसाने यांनी केले आहे. 


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image