सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले असून याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रभाग क्र. 8 मध्ये नगरसेवक रामचंद्र मुक्कावार व सामाजिक कार्यकर्ते पप्पू गायकवाड यांच्या पुढाकारातून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराची वाटचाल कोरोनामुक्त शहराकडे सुरू आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रभाग क्रमांक 8 मध्ये निर्जंतुकिकरणाची फवारणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक रामचंद्र मुक्कावार, पप्पू गायकवाड, मारोती कोटलवार, संजय शाहीर, रवींद्र हसरगुंडे, कुमार चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक रामचंद्र मुक्कावार व पप्पू गायकवाड यांनी नागरिकांनी घराबाहेर न येता आपल्या घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.
प्रभाग 8 मध्ये निर्जंतुकिकरणाची फवारणी उदगीर:
addComments
टिप्पणी पोस्ट करा