उदगीरच्या शिवाजी चौकात भाजपाचे आंदोलन

उदगीरच्या शिवाजी चौकात भाजपाचे आंदोलन


उदगीर: कोरोना आजारावर उपाय योजना करण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले असा आरोप करीत कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे कोणतीही प्रभावी उपाययोजना करु न शकणाऱ्या अकार्यक्षम राज्य सरकारच्या विरोधात * मेरा आंगण मेरा रणांगण * या माध्यमातून भारतीय जनता पार्टी च्या वतीने आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.


उदगीर येथील शिवाजी चौकात भाजपाचे तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे यांच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, लातूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जि. प. सदस्य रामचंद्र तिरुके, भगवान पाटील तळेगावकर, बापूराव राठोड, शहराध्यक्ष उदय सिंग ठाकूर , मनोज पुदाले, गणेश गायकवाड, आनंद साबणे, नामदेव आपटे, पंडित सुकणीकर, अमोल निडवदे, दिलीप मजगे, लक्ष्मण फुलारी, श्रीकांत पारसेवार, नागेश अष्टुरे, विकास जाधव, सुजित जीवने आदी पदाधिकारी उपस्थित होते.