*कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू: अंत्यसंस्कारासाठी कोणीही येईना: माणूसकिच्या भावनेतून मुख्याधिकारी राठोड अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावले*

*कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू: अंत्यसंस्कारासाठी कोणीही येईना: माणूसकिच्या भावनेतून मुख्याधिकारी राठोड अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावले*
उदगीर : शहरातील एका कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे माहिती मिळताच संवेदनशील मनाचे असलेले मुख्याधिकारी भारत राठोड हे स्वतः पुढे येऊन या महिलेवरील अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार पार पाडले.
उदगीर येथील प्रभाग क्रमांक 7 मधील एक महिला अनेक वर्षांपासून कॅन्सरने ग्रस्त होती. शुक्रवारी रात्री तिचा मृत्यु झाला . तिच्या पश्चात घरात एक मुलगा आहे. कोरोनाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. सदरील घटनेची माहिती प्रभागातील कार्यकर्ते अमोल अनकल्ले यांनी मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या कानावर घातली. 
सदरील घटनेची माहीती मिळताच मनाने संवेदनशील असलेल्या मुख्याधिकारी राठोड यांनी आपले कर्तव्य तर आहेच पण माणुसकीच्या भावनेतून या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतः घटनास्थळी आपल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दाखल झाले. सदरील महिलेच्या प्रेताचे मेडिकल चेकअप करून अंबुलन्सची सोय केली. व सदरील महिलेवर अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण केले. यावेळी नगरसेवक मनोज पुदाले, दिलीप अनकल्ले यांची उपस्थिती होती.
यापूर्वी कोरोना ग्रस्त महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील मुख्याधिकारी राठोड यांनी पुढाकार घेतला होता. त्या प्रसंगातील अनुभव त्यांनी व्यक्त केले आहेत. मुख्याधिकारी राठोड यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.