डॉ. माधव चंबुले हे रुग्णासाठी एक देवदूतच ...............

डॉ. माधव चंबुले हे रुग्णासाठी एक देवदूतच ...


 उदगीर येथील शेल्हाळ रोडवर गेली कित्येक वर्षापासून चालू असलेले, उदयगिरि मल्टीस्पेशलिटी व एक्सीडेंट हॉस्पिटल हे हॉस्पिटल उदगीर शहरात नावाजलेले हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटलची ओळख व ख्याती आहे. या हॉस्पिटलमध्ये उदगीर बरोबरच कर्नाटकच्या सीमाभागातील रुग्ण हे या हॉस्पिटल मध्ये दररोज दाखल होत असतात. हे हॉस्पिटल रुग्णासाठी 24 तास खुले राहणारे उदगीर शहरातील पहिले हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. या हॉस्पिटलमध्ये नावाजलेले, तज्ञ व अनुभवी डॉ. माधव चंबुले डॉ. रमण रेड्डी, डॉ. बलशेटवार , डॉ. रेखा रेड्डी, डॉ ढोकाडे डॉ. जगताप या तज्ञ डॉक्टरांचा ग्रुप आहे. रुग्ण हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या नंतर त्याच्यावर तातडीने उपचार केले जातात. डॉ. माधव चंबुले हे एम एस असुन अनुभवी डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा 1 जून 2020 रोजी वाढदिवस आहे. सध्या कोरोना या विषारी संसर्ग रोगाने संपूर्ण जगाला परेशान केलेले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी आपला वाढदिवस हा साधेपणाने करण्याचे आयोजन केलेले आहे. डॉ. माधव चंबुले हे या दवाखान्याच्या स्थापनेपासून आज पर्यंत रुग्णाची सेवा करत आलेले आहेत. त्यांच्या हातून आज पर्यंत 10,000 दहा हजाराचे वर त्यानी पोटाच्या शस्त्रक्रिया केलेले असून, रुग्ण हे दुरुस्त झालेले आहेत. आज त्यांच्या नावाला लौकीकता आहे. आज पर्यंत डॉक्टरी व्यवसाय करत असताना, त्यानी प्रामानिकपणे रुग्णांची सेवा केलेली आहे.त्याच बरोबर त्यांनी गरीब रुग्णाची पण जाण नेहमीच ठेवलेली आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये गरीबीतला गरीब रुग्ण हा जाताना त्यांचे नाव घेतल्याशिवाय रहात नाही. ही त्यांच्या कार्याची पावती आहे. डॉ. माधव चंबुले यांच्या वाढदिवसानिमित्त मला त्याची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आहे. म्हणूनच त्यांच्या बद्दल दोन शब्द लिहावे असे मला वाटल्याने मी त्याच्या बद्दल लिहीत आहे. डॉ. माधव चंबुले हे मुळचे राहणार डोणगाव वाडी तालुका औराद जिल्हा बिदर येथील रहिवाशी आहेत. त्यांचा जन्म हा 1972 ला झाला असून त्यांचे संपूर्ण नाव माधव इरप्पा चंबुले असे आहे. त्यांचे वडील इरप्पा चंबुले हे वारकरी संप्रदायातील असून ते वारकरी म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्य सेनानी दिगांबरराव मुळे त्यांच्यासोबत त्यांनी पण स्वातंत्र्य संग्रामात काम केलेले आहेत. परंतु त्यांनी सरकारचा कसलाच फायदा घेतलेला नाही. त्यांचे वडील हे एक प्रगतशील शेतकरी, वारकरी व स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळखले जातात. आज वयाच्या 100 च्या घरात गेलेले असताना देखील आपल्या मुलाला आजही मार्गदर्शन करीत असतात.लहाणपणापासुनच त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज माधव चंबुले हे डॉक्टर झालेले आहेत. डॉ. माधव चंबोले यांना त्याची आई लहाणपणी जेवढे प्रेम देत होती तेवढेच प्रेम वडील आज पण देत असतात. डॉक्टरी हा व्यवसाय करताना देखील ते त्यातून वेळ काढून आपले कुटुंबाकडे पण नेहमीच लक्ष देत असतात. त्यांचे शालेय शिक्षण हे मौजे डोणगाव वाडी तालुका औराद येथे जिल्हा परिषद शाळेत सातवी पर्यंत झालेले आहे. त्या नंतर त्यांनी एक वर्ष शाळेत शिक्षण न घेता शेती व्यवसाय पण केलेला आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी त्यावेळेस चांगली दर्जेदार शेती करून दाखवलेली होती. दर्जेदार शेती केल्यानंतर परत त्यानी शिक्षण क्षेत्रात उडी घेतली. उदगीर येथील नावाजलेल्या श्यामलाल स्मारक विद्यालयात मुख्याध्यापक होळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी, नवी व दहावीचे शिक्षण पूर्ण केले. या ठिकाणी त्यांनी 619 गुण मिळवून शाळेचे व आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करून दाखवले.काम करण्याची सवय असल्यामुळे त्यांनी उन्हाळी सुट्टीच्या दिवसात हैदराबाद येथे ऑफिस बॉय म्हणून देखील काम पाहिलेले आहे. दहावी नंतर आपण डी.एड.करुन शिक्षकाची नोकरी करावी असा त्यांचा मानस होता. परंतु गुरुजनांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात येथे 11 व 12 वी चे शिक्षण घेतले. याही ठिकाणी त्यांनी चांगले मार्क्स घेऊन शिवाजी महाविद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान त्यांनी त्यावेळेस मिळवला. याही ठिकाणी गुरुजनांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी डॉक्टर व्हावे असे मार्गदर्शन त्याना त्यावेळी मिळाले. स्वातंत्र्य सेनानी दिगांबरराव मुळे अण्णा यांनी त्यांना डॉक्टरी शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आणले. व या ठिकाणी त्यांनी एम बी बी एस चे शिक्षण नायर मुंबई येथून पुर्ण केले. त्या नंतर त्यांनी एम एस चे शिक्षण हे जे.जे. मुंबई येथून पूर्ण केले. काही महिने नागपूर व अकोट येथे त्यानी प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर काही वर्ष उदगीर येथील डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्याबरोबर पण त्यांनी काम केलेले आहे. असा त्यांचा जीवनाचा प्रवास एकंदरीत झालेला आहे.तरी ही या कामात त्यांना समाधान वाटले नाही. म्हणून त्यानी स्वतंत्र हॉस्पिटल देगलूर रोड येथे डॉक्टर नळगीरकर यांच्या जागेत त्यावेळी चालवले होते. रुग्णांना सेवा देण्यासाठी आपण उदगीर येथे एखादे मोठे हॉस्पिटल काढावे हा त्यांचा माणस होता. यावेळी डॉ. नारायण सुरवसे , डॉक्टर रमण रेड्डी , डॉक्टर रेखा रेडी, डॉक्टर बलशेटवार व डॉक्टर माधव चंबुले या सर्वांनी मिळून शेल्हाळ रोडवर जागा खरेदी करून या ठिकाणी उदयगिरि मल्टीस्पेशलिटी एक्सीडेंट हॉस्पिटलची स्थापना केली. आज बरेच वर्षापासून हे हॉस्पिटल रंगा रूपाला आलेले असुन आज 24 तास सेवा देत आहे. या हॉस्पिटलला दोनशे बेडचे हॉस्पिटल करावे असा त्यांचा नेहमीच मानस होता. परंतु काही अडचणीमुळे हे हॉस्पिटल दोनशे बेडचे होऊ शकले नाही.त्या बद्धल त्याची आजही खंत आहे. यापुढे भविष्यात लोकसहभागातून व दानशूर व्यक्तीकडून कमी भावात उदगीर लगत जमीन मिळालेस निश्चितच दोनशे बेडचे हॉस्पिटल करण्याचा त्यांचा मानस आहे असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले. कोरोनाच्या संकट काळात 24 तास सेवा देणारे कर्मचारी यांचा पगार कपात न करता पगार वेळेवर देणारे हे उदगीर मधले पहिले हॉस्पिटल ठरलेले आहे. शेवटी त्यांनी आपल्या डॉक्टरी व्यसयाचे आज पर्यंतचे सर्व श्रेय हे त्यानी आपले आई-वडिलांना दिलेले आहे. त्यांच्या मुळेच मी आज इथ पर्यंत आलेला आहे. असे त्यानी शेवटी सांगितले. डॉक्टर साहेब तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणाला दीर्घायुष्य लाभो, आपल्या मनोकामना पूर्ण होवो, असेच रग्णांना व गोरगरिबांना सेवा देण्याचा लाभ भविष्यात आपणाला मिळत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून, आपणाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देत आहे......... पत्रकार.अंबादास अलमखाने............


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज