कृषी विभागामार्फत बांधावर बियाणे व खत वाटप मोहीम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ

कृषी विभागामार्फत बांधावर बियाणे व खत वाटप मोहीम
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ 
  लातूर,:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त कृषी निविष्ठा या बांधावर वाटप कराव्यात .शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये उदगीर तालुक्यात तालुक्याच्या मागणी प्रमाणे खत , बियाणे उपलब्ध होत आहे परंतु कोरोना असल्यामुळे दुकानातील गर्दी टाळण्यासाठी कृषी निविष्ठा गटामार्फत खरेदी कराव्या असे आवाहन राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी केले.
कृषी विभागामार्फत बांधावर बियाणे व खत वाटप मोहीमेचा शुभारंभ राज्यमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळीजिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष ...राहुल केंद्रे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार, श्री.दत्तात्रय गावसाने , कृषी विकास अधिकारी, श्री.चोले उपविभागीय कृषी अधिकारी , श्री .महेश तीर्थंकर ..तहसीलदार श्री .व्यंकटेश मुंढे तालुका कृषी अधिकारी श्री .सिद्धेश्वर मोकळे ..कृषी अधिकारी पंचायत समिती श्री. सातपुते कृषी सहायक श्री .सुनील चव्हाण व शेतकरी उपस्थित होते .
 या प्रसंगी राज्यमंत्री यांनी सांगितले की गावात गट नसेल तरी 5-10 शेतकरी एकत्र येऊन मागणी करून खरेदी करू शकतात .तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वतःकडील मागील हंगामातील उत्पादित सोयाबीन बियाणे म्हणून वापरावे .त्यासाठी त्यांनी त्याची उगवण क्षमता तपासणी घरच्या घरी करावी .बांधावर बियाणे खत वाटप व घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यासंदर्भात अधिक माहिती साठी आपल्या गावातील कृषी सहायक तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. 


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही