डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा

डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा



 लातूर :-

लातूर शहर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीच्या उमेदवार डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या व्यापारी मतदार भेटी-गाठी व संवाद पदयात्रा कार्यक्रम दि. 2 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4.00 वा. होईल. 

या संवाद पदयात्रेला गंजगोलाई येथून श्री जगदंबा माता देवीची आरती करून पदयात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष  देवीदासजी काळे यांची उपस्थिती राहणार आहे. ही पदयात्रा गंजगोलाईतून  निघून छत्रपती शिवाजी महाराज रोड, नांदेड रोड मार्गे गूळ मार्केट, सराफ लाईन, हनुमान चौक येथे नारळ वाढउन कापड लाईन, भूसार लाईन, सुभाष चौक ते हत्ते काॅर्नर, मस्जिद रोड जाऊन पद यात्रेचा गंजगोलाईत समारोप होणार आहे. 

सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाई महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक गणेश गवारे, शिवसिंह सिसोदिया, अनिल पतंगे, आनंद कोरे यांनी केले आहे. 




टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज