पालिका सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव : उदागिर बाबा मित्र मंडळाचा उपक्रम !

पालिका सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव :
उदागिर बाबा मित्र मंडळाचा उपक्रम !
उदगीर:-"सेवा परमो धर्म" या उक्तीला सार्थ ठरवत कोरोनाच्या कठीण काळात , घराच्या बाहेर पडून, आपला जीव धोक्यात आहे याची पूर्ण जाणीव असून , आपण घरी सुरक्षित असताना आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा येथील उदागीर बाबा मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उदगीर शहरातील युवा व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन उदागीर बाबा मित्र मंडळाची स्थापना केली आहे.
शहरातील सफाई कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असतात त्यांच्या कार्याचा, कष्टाचं सन्मान व्हावा ही जाणीव ठेवून आणि एक सामाजिक जबाबदारी समजून उदागिर बाबा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उदगीरमध्ये डॅम रोड येथे या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी गल्लीत दररोज नित्यनियमाने येणारे नगर परिषदेचे स्वच्छता सेवक 9 यांचा नित्यनियमाने साफसफाई साठी येणाऱ्या रोजच्या रस्त्यावर पुष्प तथा फुलांच्या वर्षवाने स्वागत केलं आणि प्रत्येकाचा शाल श्रीफळ तथा सदिच्छा भेट म्हणून छोटीशी राशी अदा करण्यात आली. 
उपनगराध्यक्ष सुधीर भोसले यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडला. 
या कार्यक्रमासाठी हर्ष भूतडा, विष्णू मुंडे, द्वारकासजी भूतडा ,सुनील खंदाडे, चैतन्य गुरव, किशोर शिवपुरे, चंद्रकांत रोडगे ,अनंत खेडकर, सोनू भोसले,ओम खंदाडे, प्रसाद रुद्रवार, बस्वराज होणराव, भारतीताई भोसले, ललिता भुतडा , कांता कालाणी, अनिता बलदवा, शोभा इनानी यांनी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान.    मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.  
इमेज
लॉयनेस क्लब गोल्ड च्या अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील यांची निवड.*
इमेज
प्रभाग 8 मध्ये निर्जंतुकिकरणाची फवारणी उदगीर:
इमेज
मराठी राजभाषा दिनानिमित्त उदयगिरीत 28 फेब्रुवारीला ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकरांचे व्याख्यान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज