रुग्ण सेवेबरोबरच, कर्मचाऱ्याकडे पण लक्ष देणारे उदयगिरी मल्टिस्पेशालिटी व अपघात हॉस्पिटल !
उदगीर: सध्या कोरोना या विषारी संसर्ग रोगाने भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला पण परेशान केलेले आहे. या पार्श्वभूमीवर उदयगिरी मल्टिस्पेशालिटी व अपघात हॉस्पिटल शेल्हाळ रोड, उदगीर यांनी सर्वसामान्य कर्मचाऱ्याची दखल घेऊन, सर्व डॉक्टरा बरोबरच खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत सर्वांना एकच एन-९५ या मास्कचे वाटप संस्थापक संचालक तथा सुप्रसिद्ध सर्जन तज्ञ डॉ. माधव चंबुले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
आज उदगीर येथील शेल्हाळ रोडवरील उदयगिरी मल्टिस्पेशालिटी व अपघात हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर आजाराच्या रुग्णावर दिवस-रात्र सेवा देणारे उदगीर मधील एकमेव हॉस्पिटल आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णावर २४ तास सेवा येथे दिली जाते. या हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी हे कोरोनाचे पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीत इतर आजारावर येणाऱ्या रुग्णांची सेवा करत आहेत. म्हणून या हॉस्पिटल मधील संस्थापक संचालक तथा प्रसिध्द सर्जन तज्ञ डॉ.माधव चंबुले यांनी हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टरा बरोबरच सर्व कर्मचाऱ्यांना एकच मास्क एन-९५ हे नुकतेच वाटप केलेले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
रुग्ण सेवेबरोबरच, कर्मचाऱ्याकडे पण लक्ष देणारे उदयगिरी मल्टिस्पेशालिटी व अपघात हॉस्पिटल !
addComments
टिप्पणी पोस्ट करा