तरूणाईने सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - प्रा. स्नेहल पाठक 


तरूणाईने सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - प्रा. स्नेहल पाठक वन रोमहर्षक व दीपस्तंभासारखे असून तरुणाईसाठी ते प्रेरणास्त्रोत आहे. त्यामुळे सावरकरांचे चरित्र व त्यांनी निर्माण केलेले साहित्य तरुणाईने आवर्जून वाचावे. देशभक्तीचे जाज्वल्य रूप म्हणजे सावरकर ! प्रचंड वाचन, ध्येयनिष्ठा, राष्ट्रभक्ती, भाषाभ्यास, कर्तव्यनिष्ठता, राष्ट्राभिमान यांच मिश्रण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होत, असे मत स्नेहल पाठक यांनी संस्कार भारती शाखा उदगीर च्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित 'सावरकर : एक समर्पित जीवन' या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने व्यक्त केले.


पुढे बोलताना प्रा. पाठक म्हणाल्या, संकल्प, बलिदान, संघर्ष, असह्य वेदना, सश्रम कारावास, काळ्यापाण्याची शिक्षा यावरती मात करत देशाप्रतीचा समर्पण भाव व त्यांनी निर्माण केलेली साहित्य कृती तरुणाईने आजच्या प्रतिकूल परिस्थितीत लक्षात घ्यावी. राष्ट्रीय स्वातंत्र्य व त्यानंतर सामाजिक सुधारणा याबाबतचे सावरकरांचे योगदान अलौकिक आहे. त्यामुळे सावरकरांचा तरुणाईने आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात संस्कार भारती देवगिरी प्रांत, अंबाजोगाई, तुळजापूर, उस्मानाबाद, नांदेड, माजलगाव येथील संस्कार भारतीचे पदाधिकारी सहभागी होते. याप्रसंगी संस्कार भारतीचे ध्येयगीत डॉ. अर्चना पाटील यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची रचना प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सौ. संध्या पत्तेवार, श्री. प्रदिप पत्तेवार, सौ. अंबिका जेवळीकर, रिषभ पत्तेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ. प्रीती दुरुगकर यांनी तर आभार संरक्षक डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी मानले.