उदयगिरित लोकप्रशासन विभागाच्यावतीने राष्ट्रीय वेबिनार संपन्न

उदयगिरित लोकप्रशासन विभागाच्यावतीने राष्ट्रीय वेबिनार संपन्न


उदगीर :(दिनांक 31 मे )येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्यावतीने ऑनलाइन पद्धतीने 'कोरोनाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासनावर होणारा परिणाम' या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर व सचिव प्रा. मनोहरराव पटवारी यांनी शुभेच्छा संदेश देऊन केले. राष्ट्रीय वेबिनारसाठी साधन व्यक्ती म्हणून कामता प्रसाद सुंदरलाल साकेत महाविद्यालय, आयोध्या, उत्तर प्रदेश येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमुद रंजन व मगध विश्वविद्यालय, बोधगया, बिहार येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. शैलेंद्र कुमार सिंग हे होते.


          यावेळी बोलताना डॉ. कुमुद रंजन यांनी कोरोनाविरुद्ध सक्षमपणे सामना करणाऱ्या डब्ल्यू. एच. ओ., डब्ल्यू.टी.ओ., जी-20, सार्क यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना विषयी सविस्तर माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन, अमेरिका, इटली, रशिया, जपान, भारत येथील प्रशासकीय व्यवस्थांचा त्यांनी आढावा घेतला. कोरोनामुळे भारतीय प्रशासकीय व्यवस्था प्रभावित झाली असली तरी जागतिक स्तरावर भारतासाठी ही एक चांगली संधी आहे,अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केला. डॉ. शैलेंद्र सिंग यांनी भारतीय प्रशासकीय व्यवस्थेच्या 'स्टील फ्रेम' विषयी भाष्य केले. डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, प्रशासकीय सर्व अधिकारी व कर्मचारी यामुळेच कोरोनासारख्या महामारीचा भारत सक्षमपणे मुकाबला करत आहे. आपत्ती वारंवार येत असते परंतु आलेल्या आपत्तीतून आपण काही गोष्टी शिकण्याची आवश्यकता आहे. भारतीय प्रशासन व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करावा, असे आवाहन याप्रसंगी बोलताना केले.


       कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी तर आभार लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले. दयानंद स्वामी यांनी तांत्रिक सहकार्य केले. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये 598 प्राध्यापक संशोधक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज