डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान

डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान


उदगीर (विक्रम हलकीकर) : पैसे कमविणे हा उद्देश ठवून वैद्यकीय व्यवसाय करणारी मंडळी मोठया प्रमाणात पहायला मिळतात. पण हा व्यवसाय नाही तर सेवा आहे या भावनेतून काम करणारी मंडळी देखील अनुभवास येतात. अशाच पद्धतीने सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टर म्हणून अनुप चिकमुर्गे यांचे नाव घ्यावे लागेल. अमृत हॉस्पिटलच्या माध्यमातून लॉकडाऊन च्या काळात डॉ चिकमुर्गे दाम्पत्याने उदगीरकरांना दिलेली सेवा पाहता हे हॉस्पिटल उदगीरकरासाठी वरदानच ठरले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


डॉ. अनुप चिकमुर्गे व त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया बाबुराव विभूते (चिकमुर्गे) या दोघांचेही मूळ गाव उदगीर. दोघांनीही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उदगीर येथेच पूर्ण केले.त्यांनतर डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी एम. बी. बी. एस. चे शिक्षण मुंबई येथे नायर हॉस्पिटलमध्ये तर त्यापुढील एम. डी. चे शिक्षण जॉन कॉलेज बेंगलोर येथे पूर्ण केले. तर डॉ. सुप्रिया यांनी एम.बी.बी.एस. व एम .डी. या दोन्ही पदव्या सायन हॉस्पिटल मुंबई येथून संपादन केल्या आहेत. 


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई व लातूर अशा ठिकाणी काही वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या मातृभूमितील गरजू लोकांना करून घ्यावा या प्रांजळ हेतूने चिकमुर्गे दाम्पत्याने उदगीर येथे हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि सप्टेंबर 2019 मध्ये अमृत हॉस्पिटल या नावाने आपले हॉस्पिटल सुरू केले. मूळ गाव उदगीर हेच असल्याने त्यांना स्थानिक सामाजिक व आर्थिक परिस्थितीची चांगली जाणीव आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे अगोदर मानसिक दृष्ट्या समाधान करणे व त्यावर योग्य उपचार करण्याचे काम अमृत हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू झाले. दरम्यानच्या काळात सर्वत्र कोरोनाच्या चांगलाच कहर माजविला, तसाच कहर उदगीर शहर व तालुक्यात देखील माजला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दवाखाने काही दिवस बंद राहिले. तर काही डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने सेवा देण्यास सुरुवात केली. काही डॉक्टर कोरोनाच्या भीतीने रुग्णाला दोन तीन मीटरच्या लांबीवरून तपासू लागले. मात्र या काळात कोणत्याही आजाराचा रुग्ण आल्यास आपल्या जीवाची बाजी लावत डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी प्रत्येक रुग्णाला जवळून तपासत त्याला काय त्रास होत आहे याची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करीत त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे त्यांच्या अर्धांगिनी डॉ. सौ. सुप्रिया चिकमुर्गे या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये मध्ये अतिशय धडाडीने सेवा देताना दिसल्या. 


कोरोनाच्या काळात उदगीरच्या अनेक रुग्णांना अमृत हॉस्पिटल म्हणजे एक समाधान करणारे मंदिरच वाटत होते. नावाप्रमाणेच या हॉस्पिटलमधून उपचार रूपी अमृत रुग्णांना मिळाल्याने कण्हत आलेला रुग्ण परत जाताना हसत जात आहे. डॉ. चिकमुर्गे दाम्पत्यांना खऱ्या अर्थाने कोविड योद्धा समाजाने गौरव केला पाहिजे.


रुग्णांची आर्थिक परिस्थिती ओळखून त्या रुग्णांना सेवाभावी वृत्तीने देण्याचे काम केल्यामुळे रुग्ण न नातेवाईकांकडून डॉक्टरांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे.