लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर/प्रतिनिधी: भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ गंजगोलाईतून काढण्यात आलेल्या पदयात्रेला शहरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.विविध समाजघटकातील नागरिक,व्यापारी,महिला व युवक-युवतींनी या यात्रेत सहभाग नोंदवला. यामुळे लातूर शहर मतदारसंघातील मतदार व नागरिक आपल्या लाडक्या बहिणीच्या अर्थात डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने उभे असल्याचे चित्र दिसून आले.
डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दीपावलीचे औचित्य साधत गंजगोलाईतील श्री जगदंबा मातेची आरती करून पदयात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराज रोड,सराफ लाईन,गुळ मार्केट,कामदार रोड, हनुमान चौक,सुभाष चौक,मस्जिद रोड या मार्गे निघालेल्या या पदयात्रेचा पुन्हा गंजगोलाईत समारोप झाला.
पदयात्रेदरम्यान उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधला.त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही केली. गंजगोलाई हे लातूरचे हृदय मानले जाते.या परिसरात व्यापार केंद्र असून शहरातील नागरिक खरेदीसाठी या भागात येतात.शहराच्या प्रत्येक भागातील नागरिक आणि व्यापारी येथे भेटतात.डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी या मंडळींशी संवाद साधला. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
पदयात्रेदरम्यान खरेदीसाठी गंजगोलाई परिसरात आलेल्या नागरिक,महिला व युवक- युवतींशीही अर्चनाताई बोलल्या.सामान्य नागरिकांना थांबून बोलणाऱ्या अर्चनाताईंचे नागरिकांनीही कौतुक केले.
लातूरची बाजारपेठ राज्यात प्रसिद्ध असून येथील गंजगोलाईची अनोखी रचना इतरत्र कुठेही आढळत नाही. त्याच पद्धतीने लातूरकर माणसाचं मन असून लातूरसारखी माणसं राज्यात कुठेही भेटत नाहीत,असे डॉ. अर्चनाताई यावेळी बोलताना म्हणाल्या.नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रश्न समजून घेतले.शह
addComments
टिप्पणी पोस्ट करा