उदगीरात कोरोनाबाधितांमध्ये आणखी दोघांची भर
लातूर:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 22 मे 2020 रोजीचे एकुण 21 अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी उदगीर येथील 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व निलंगा येथील 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल अनिर्णित (Inconclusive) आले आहेत.
*लातूर जिल्हा कोरोना विषाणू अपडेट, दिनांक 22 मे 2020*
*जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्ण- 79*
*उपचार घेत असलेले रुग्ण- 41*
*उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण- 36*
*मृत्यू झालेले रुग्ण-2*
*उस्मानाबाद*
उस्मानाबाद येथील 10 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित (Inconclusive) आले असून एका व्यक्तीचा अहवाल परिपूर्ण न आल्यामुळे रद्द (reject)करण्यात आला आहे.
*बीड*
बीड येथील 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 6 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा