55 वय वर्षे पेक्षा अधिकच्या व्यक्तींची  पल्स ऑक्सीमिटरने तपासणी करावी: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत 

55 वय वर्षे पेक्षा अधिकच्या व्यक्तींची 


पल्स ऑक्सीमिटरने तपासणी करावी: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत 


 


लातूर:- जिल्हयातील 55 वयोवर्षे पेक्षा अधिकच्या प्रत्येक व्यक्तींची आरोग्य विभागाने पल्स ऑक्सीमिटरने तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोरोना संबंधित सनियंत्रण समिती आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त देविदास टेकाळे ,अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे उपस्थित होते.


या बैठकीस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांचा प्रार्दुभाव वाढत आहे. प्रत्येक विभागाने आपणास नेमून दिलेली कामे नियोजन पूर्व करावेत. कंटेनमेंट झोन मधील झेानल ऑफिसरने शासनाच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे आपले कर्तव्य बजावणे नितांत गरजेचे आहे.जिल्हयातील 55 वर्षावरील प्रत्येक व्यक्तींची आरोग्य विभागाने पल्स ऑक्सीमिटरने तपासणी करावी अशा स्पष्ट सुचना या वेळी दिल्या. 


प्रत्येक विभागातील नोडल अधिकाऱ्याने बाधित क्षेत्रातील संबंधितांकडून गृह विलगीकरणाबाबतचे संमती पत्र घेऊन गृह विलगीकरण करावे. व त्या घरास स्टीकर लावण्यात यावे असे सूचित केले.कोरोना सनियंत्रण समितीच्या सदस्याने जिल्हयात उभारण्यात आलेल्या कोवीड सेंटरला भेट देऊन नियंत्रण ठेवावे. अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिल्या.


या बैठकीस जिल्हा कोरोना सनियंत्रण समितीचे सदस्य ,आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


 


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज