पर्यावरण संवर्धनासाठी "हरित वसुंधरा "ने पुढाकार घ्यावा: बसवराज पाटील नागराळकर

पर्यावरण संवर्धनासाठी "हरित वसुंधरा "ने पुढाकार घ्यावा:


बसवराज पाटील नागराळकर


उदगीर---पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असून, या कामात उदगीरच्या हरित वसुंधरा या संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी केले.


उदगीर तालुक्यातील हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या गडावर सोमवारी हरित वसुंधरा या पर्यावरण प्रेमी संस्थेच्या कामाचा शुभारंभ व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागराळकर यांनी हत्तीबेटाच्या विकास कामाचा गौरव करून भविष्यात या क्षेत्राचा अधिक विकास होण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.


कार्यक्रमास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबरखाने, न. प. चे मुख्याधिकारी भारत राठोड, सुरेंद्र आकनगिरे, अभिजित औटे, हरित वसुंधरा च्या शोभा कोटलवार, चंद्रकला बिरादार, मीनाक्षी स्वामी, सुनीता पंडित, सुमन राठोड, दीपाली औटे, सुनेजा मठपती,सुषमा मुळे,रुद्राणी साकोळकर, आनंद कुलकर्णी, संजय कुलकर्णीआदींची उपस्थिती होती.


प्रास्ताविक व्ही. एस. कुलकर्णी यांनी केले.


जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबरखाने यांनी वृक्ष लागवडीच्या कामात लातूर जिल्हा अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी सामूहिक सहभागाची आवश्यकता असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी भारत राठोड हत्तीबेटाचे दिसत असलेले सौन्दर्य नजरेत भरणारे असून, या ठिकाणी झालेल्या वृक्ष लागवडीच्या कामांची प्रेरणा घेऊन अन्यत्र अशा प्रकारचे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते हत्तीबेटावर वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन सुनंदा सरदार यांनी तर आभार प्रदर्शन विक्रम हलकीकर यांनी केले.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image