पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करा -राज्यमंत्री संजय बनसोडे

पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करा


-राज्यमंत्री संजय बनसोडे


*उदगीर व जळकोट तालुक्यात जल जिवन मिशन योजना राबविणार


*नाला खोलीकरण तसेच केटीवेअर बंधारे प्रस्ताव दाखल करावेत


 


लातूर:- जिल्हयातील पाणीपुरवठा योजनेची कामे संबंधीत विभागाने वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम , रोजगार हमी, भुकंप पुनर्वसन व संसदीयकार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.


 शासकीय विश्रामगृह येथे आयोजित उदगीर व जळकोट तालुक्यातील पाणी पुरवठा जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.कायंदे, जलसंधारणचे अभियंता श्रीमती ठोंबरे, उदगीर कृषि उत्तपन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर (मुन्ना) पाटील उपस्थित होते.


 या बैठकीस मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, जिल्हयात तसेच उदगीर व जळकोट तालुक्यात पाणी पुरवठा योजनेची कामे चालू आहेत. ती कामे वेळेत पुर्ण करण्याच्या सूचना देऊन या पुढे उदगीर व जळकोट तालुक्यात जल जिवन मिशन योजना राबविणार असल्याचे सूचित केले. तसेच या तालुक्यातील कालवा दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ संबंधित विभागाने दाखल करावेत. त्यास जिल्हा नियोजन मंडळांकडून निधी मिळवून देऊ तसेच या तालुक्यातील नाला खोलीकरण , केटीवेअर बंधारे यांचे प्रस्ताव शासनास ताबडतोबीने सादर करावेत अशा सूचना दिल्या.


 या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री. शेलार, उदगीरचे उपअभियंता श्री.कसबे, श्री. उरमोडी , जळकोटचे उपअभियंता श्री.खोपडे तसेच ज्ञानेश्वर पाटील, सरपंच मेहताब बेग, दाऊद बिरादार व गोविंद भ्रमण्णा उपस्थित होते.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image