बौध्द विहारासाठी जागा उपलब्ध करुन द्या- गजानन सताळकर
उदगीर: उदगीर नगरपालिका हद्दित बौध्द विहारासाठी दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला असून पालिका प्रशासनाने या विहारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. नगर पालिकेकडे पाच जागा सुचविण्यात आल्या आहेत त्यापैकी एका जागेचा ठराव घेऊन बौध्द विहार बांधावे अशी मागणी माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांनी केली आहे.
नूकतेच राज्यसरकारने उदगीर विकासासाठी २१ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. यात बौध्द विहार बांधण्यासाठी दोन कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे व उदगीरचे आमदार तथा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. बौध्द विहारासाठी परीपुर्ण अशी जागा नसल्यामुळे सदर बौध्द विहारासाठी पुढील पैकी एका जागेचा ठराव नगरपालिकेने घेऊन त्या ठिकाणी बौध्द विहार बाधावे ज्यात शामलाल इंजनियरींग काॅलेजच्या आवारात नवीन पाण्याच्या टाकीच्या शेजारील शासकिय जागा, रेल्वे स्टेन रोडवरील महाराष्ट्र जीवण प्राधीकरणची जागा, दुध डेअरी बसस्थानकाच्या बाजूस किंवा खतीब मश्जीदच्या बाजुची डेअरीची जागा, रजिस्ट्री कार्यालयाच्या समोरील मोकळी जागा किंवा कला मंदिराची रिकामी जागा यापैकी कोणत्याही एका जागेचा ठराव घेऊन नगर पालिका या ठिकाणी बौध्द विहार बांधावे ज्यामुळे भविष्यात पर्यटन स्थळ निर्माण होऊन उदगीरच्या वैभवात भर पडेल. शिवाय मेडीटेशनसाठी अत्यंत शांत व माणसाला त्या ठिकाणी गेल्यानंतर सुखद आनंद मिळेल. सुचविलेल्या जागे व्यतिरीक्त अन्य कोणत्याही जागेचा विचार करु नये अशी मागणी गजानन सताळकर यांनी केली आहे.