ऍड. दत्ताजी पाटील यांचा पुढाकार: आ. निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य : पालिका कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारक शक्ती गोळ्यांचे वाटप: पालिकेकडे एक हजार बांबूची रोपे सुपूर्द

ऍड. दत्ताजी पाटील यांचा पुढाकार: आ. निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य


पालिका कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारक शक्ती गोळ्यांचे वाटप: पालिकेकडे एक हजार बांबूची रोपे सुपूर्द


उदगीर : राज्याचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील यांच्या पुढाकारातून आज दिवसभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. 


माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील यांनी उदगीर नगर परिषदेला एक हजार बांबूच्या झाडाची रोपे दिली. त्यासोबत 15 कडुलिंब, 10 गुलमोहर, 15 करंजी व एक चिंचेच्या झाडाचे रोप नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व मुख्याधिकारी भारत राठोड यांच्याकडे सुपूर्द केली. 


हवेतील बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी थांबविण्यासाठी बांबू उपयोगी पडणारे वृक्ष असून ऍड. दत्ताजी पाटील यांनी ही रोपे दिल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.


सकाळी आ. संभाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ऍड. दत्ताजी पाटील यांच्या पुढाकारातून नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना गुळ शेंगदाणे व रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 


या दोन्ही कार्यक्रमास नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामेश्वर पवार भाजपाचे शहराध्यक्ष उदय ठाकूर, युवा नेते शहाजी पाटील, नंदकुमार बीजलगावकर, यांची उपस्थिती होती.


टिप्पण्या
Popular posts
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज