विनोबांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा होय : अनिता जगताप

विनोबांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा होय : अनिता जगताप


उदगीर: आपण सर्वजणच परमेश्वराचे अंश आहोत असे मानणारे विनोबा स्वतः पुण्याचे अभिलाषी नव्हते तरा ते सेवेचे अभिलाषी होते. जगात अहिंसा प्रस्थापित करायची असेल तर अगोदर स्वतःला देहापासुन शक्य तितके अलग राहुन कम करावे लागेलअसे म्हणणारे विनोबा यांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा असे मत अनिता जगताप यांनी व्यक्त यांनी व्यक्त केले.


चला कवितेच्या बनात उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचे 218 वे पुष्प कोरोणाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेला लाॕक डाऊनमुळे कौटुंबिक स्वरूपात पण फेसबुक लाईव्ह घेण्यात आले. प्रा.राजपाल पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वाचक संवादात संत ज्ञानेश्वर प्रा.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता जगताप यांनी डाॕ पराग चोळकर लिखित प्रेमपंथ अहिंसेचा या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, आज जगाला शास्त्राच्या भुकेपेक्षा कळकळीच्या कृतिची गरज आहे असे म्हणणाऱ्या विनोबांच्या जीवनातील अनेक घटना, अनुभव , प्रसंग आणि त्याच्या विचार दर्शनाचे प्रत्येक पैलू सांगितले. शेवटी प्रा.राजपाल पाटील यांनी यथायोग्य अध्यक्षिय समारोप केला.


यानंतर संपन्न झालेल्या चर्चेत फेसबुकवरूनच काही प्रश्न विचारले गेले. यावेळी जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. या वाचक संवादाचे सूत्रसंचालन कु.ऋतुजा पाटील हिने केले. प्रास्ताविक संयोजक अनंत कदम यांनी मांडले तर आभार कु.प्राची अपसंगेकर हिने मानले.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' बुधवारी उदगीरात....*
इमेज