योग दिवस हा घरी बसूनच साजरा करावे -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

योग दिवस हा घरी बसूनच साजरा करावे


-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत 


लातूर:- जिल्हयातील सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दिनांक 21 जून 2020 रोजी यावर्षी देखील केंद्र शासनाने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रम मोठया प्रमाणामध्ये साजरा करण्याविषयी कळविले आहे. परंतु सध्या कोविड -19 आजाराचा प्रार्दुभाव असल्याने मोठया प्रमाणात लोकांना एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने योग प्रात्याक्षिके- आसने घरामध्येच करण्यावर भर देण्यात यावा.


6 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना “घरघर मे योग” ही ठेवण्यात आलेली आहे. या संकल्पनेवरुन प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये कुटुंबासोबत राहून Social Distancing चे पालन करुन योगाभ्यास करणेबाबतचा विचार मांडण्यात आला आहे. घरामध्ये योगाभ्यास केल्यामुळे संसर्गजन्य कोरोना विषाणुपासून बचाव होऊ शकतो. तसेच योगासने आपणास व आपल्या कुटुंबाला आरोग्यदारी ठेवतील. योगाभ्यासामुळे कोरोनाच्या साथ सदृश्य परिस्थितीमध्ये श्वसन संस्था व रोगप्रतिकार शक्ती यांचे बळकटीकरण करण्यास मदत होऊ शकते.


योग ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्त दाब, मधुमेह, स्थौल्य, मनोविकार, सांध्याचे विकार तसेच सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार योग करण्यामुळे कमी हेाऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच रोगी मुक्त होतात आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते.


आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक 21 जून 2020 रोजी सामुदायिक स्वरुपात साजरा न करता घरामध्ये आपल्या कुटुंबासोबत Social Distancing चे पालन करुन साजरा करावा. केंद्र शासनाच्या https://yoga.ayush.gov.in/yoga/ आणि https://main.ayush.gov.in हया बेबसाईटवर दि. 21 जून 2020 रोजी करावयाच्या योग प्रात्याक्षिकाचा common yoga protocol (CYP) व्हिडीओ व पत्रक प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तसेच Marathi भाषेतील common yoga protocol (CYP) youtube Link वर व्हिडीओ उपलब्ध् आहे. योग प्रात्यक्षिकाचा common yoga protocol (CYP) व्हिडीओ डाऊनलोडक करुन त्यानुसार घरामध्ये आपल्या कुटुंबासह योग प्रात्यक्षिके करावीत.


दिनांक 21 जून 2020 रोजी सकाळी 7 ते 7.45 पर्यंत common yoga protocol (CYP) नुसार योग प्रात्यक्षिके करावीत. त्यानंतर पुढील 15 मिनिटे इतर योगाभ्यास करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळचे डॉ. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. संजय ढगे यांनी केले आहे.


जिल्हा प्रशासन लातूर च्या वतीने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे 21 जून 2020 रोजी सकाळी 6.30 वाजता FaceBook वर लाईव्ह आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तज्ञ योग शिक्षक common yoga protocol (CYP) नुसार योग प्रात्यक्षिक दाखवतील. तरी सर्वांनी दि. 21 जून 2020 रोजी सकाळी 6.30 वाजात FaceBook वर लाईव्ह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.