<no title>वाढवणा पाटी व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा हातभार* *मदत* : *मोडुन पडलेल्या संसाराला नव्याने उभारी*

*वाढवणा पाटी व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा हातभार*


*मदत* : *मोडुन पडलेल्या संसाराला नव्याने उभारी*


उदगीर तालुक्यातील डांगेवाडी येथील तुकाराम पुंड यांच्या संसाराला काही दिवसापूर्वी मोठा आघात झाला होता. घरातील कर्ता माणुस गेल्याने घरात अडचणीचा डोंगर चढून बसला असतानाच वाढवणा पाटी व्हाट्सएप या ग्रुपने 42 हजार रूपयाची रक्कम मदतीच्या स्वरुपात पुंड यांच्या पत्नी नागीनबाई पुंड यांच्याकडे सुपुर्द केले.


नेहमी च सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वाढवणा पाटी व्हाट्सएप ग्रुपने अनेक सामाजिक कार्य ऋण म्हणून फेडण्याचा प्रयत्न केला आहे.


पुंड यांच्या कुटुंबाला एकप्रकारे आधार देण्याचे कार्य या ग्रुपने केल्यामुळे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.


या ग्रुपमधील सदस्यांनी ज्यांना जेवढी जमेल तेवढे रक्कम ग्रुपचे अँडमिन बालाजी बामणे यांच्याकडे जमा केली. यामध्ये रक्कम सोबतच धान्य सुद्धा देण्यात आले.अन्नधान्य मध्ये ज्वारी 1क्विंटल, गहु 50 किलो,तांदूळ50 किलो, साखर 25 किलो,तेल डब्बा 1,मुरमुरे पोते एक व इतर साहित्य घरपोच देण्यात आले. समाजाच्या दुर्लक्षित गोरगरीबाकडे या ग्रुपने नेहमी आधार म्हणून हातभार लावला आहे.यावेळी विवेक सुकणे,विजयकुमार बिरादार, भैय्या पुंड, अमोल काळे, बालाजी बिरादार,दता उपासे,ज्ञानेश्वर उपासे,व पुंड परिवार उपस्थित होता.



वाढवणा व्हाट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून समाजातील वंचित, गोरगरीब जनतेला आधार देण्याचे कार्य केले असून यापुढेही असेच चालू राहील.


बालाजी आबाराव बामणे


 (ग्रुप अँडमिन )



वाढवणा पाटी या ग्रुपने मला जी मदतदिली आहे,ती भावाची बहिणीला ओवाळणी असून सर्वानी माझ्या कुटुंबाला जो आधार दिला आहे, तो मी.कधीच विसरणार नाही.


नागिणबाई पुंड


( डांगेवाडी ता.उदगीर)


फोटो


वाढवणा पाटी व्हाट्सएप ग्रुपने डांगेवाडी ता उदगीर येथील नागीणबाई पुंड यांना मदतीचा हात भार लावला.यावेळी बालाजी बामणे व ईतर.


टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज