घरातच सामाजिक अंतर राखत महिलांनी केली वटपौर्णिमा साजरी


उदगीर : आज वटसावित्री पोर्णिमेनिमित निमित्त शहरातील महिलानी आपल्या घरातच सामाजिक अंतर राखून वटपौर्णिमा साजरी केली, तर अनेक ठिकाणी वडाची पूजा करून महिलांनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा असे साकडे घातले.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामजिक अंतर राखणं महत्वाचे आहे हे जाणून शहरातील हरकरे नगरातील स्नेहा चणगे यांच्यासह काही महिलांनी हे अंतर राखून चणगे यांच्या घराच्या परिसरात वडाची रोपे आणून त्याची पूजा करून हा सण साजरा केला. तर सिंचन वसाहतीच्या परिसरात ग्रीन आर्मी या संघटनेच्या महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून वटसावित्रीचा सण साजरा केला. शहरातील काही महिलांनी घरातच वडाच्या प्रतिमेची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा असे साकडे घातले.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज