बचत गटाच्या कर्ज वसुली त्वरीत थांबवा- वंचितची मागणी

बचत गटाच्या कर्ज वसुली त्वरीत थांबवा- वंचितची मागणी


उदगीर : राज्यात व देशात कोविट-१९ च्या महामरीमुळे दि. २२मार्चपासून लॉकडाउन आहे. सर्व व्यवहार बंद असल्यामुळे तळहातावर पोट असलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. याकाळात दिलासादायक म्हणजे सरकारने सर्व प्रकारच्या कर्जा वसुलीवर स्थगिती दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. अद्यापही गोरगरीब जनता कोरोनाच्या संकटातून सावरली नसुन हाताला काम नाही. अर्थिक संकट मोठे असल्यामुळे बचतगट व बँकेची सक्तीने सुरू असलेली वसुली त्वरित थांबविण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दि. २ जुलै रोजी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.


           उदगीर तालुक्यात गेल्या चार महिन्यापासून लॉकडाउन आहे. यामुळे गोरगरीब जनता प्रचंड अडचणीत सापडली असुन हाताला काम नाही. सध्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे कठीण बनले असुन अर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना बचतगटाच्या पैश्यासाठी एन. बी. एफ. सी व मायक्रो फायनान्सचे कर्मचारी वसुलीसाठी तगादा लावत आहेत. यात ग्रामीण कुट्टा, एस. के, उज्ज्वला, जनलक्ष्मी, बी. एस, सुर्या, समर्थ, एक विटास, बजाज, महिंद्रा, श्रीराम फायनान्स व इतर फायनान्सचे कर्मचारी त्रास देत आहेत. कर्ज न भरल्यास चक्रवाढ व्याजसह वसुली करण्याची धमकी देत आहेत. फायनान्सच्या त्रासमुळे कैटुंबीक वाद निर्माण होत आहेत. या मानशिक त्रासामुळे गोरगरिब कुंटूबाचे बरेवाईट झाल्यास त्यास शासन जबाबदार राहिल.


        शासनाने लॉकडाउन काळातील सर्व बचतगटांची सर्व कर्ज माफ करावीत व लॉकडाउन उठल्यानंतर पैसे भरण्यासाठी सवड देण्यात यावी. फायनान्स वसुलीवर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडीला आंदोलन करावे लागेल असे उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हा प्रक्ता डॉ. संजय कांबळे, तालुकाध्यक्ष पि. डी. कांबळे, शहराध्यक्ष दिलीप कांबळे, युवा तालुकाध्यक्ष सचिन जाधव, युवानेते मझर पटेल, देविदास बोंबळीकर, बालाजी कांबळे, विजय बामणीकर, महिला तालुकाध्यक्ष माया कांबळे, प्रविण घोरपडे, अमोल नेत्रगावकर, इंदुबाई वाघमारे आदींच्या स्वक्षऱ्या आहेत.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही