आज जिल्ह्यातील 366 जणांची स्वब तपासणी
263 निगेटिव्ह, 28 पॉझिटिव्ह 04 Inconclusive, 63 प्रलंबित व 08 रद्द
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये उदगीरचे दोन रुग्ण
लातूर: येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातील एकूण 366 जणांची स्वब तपासणी करण्यात आली. त्यापैकी 263 अहवाल निगेटीव्ह तर 28 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. 63 अहवाल प्रलंबित तर 4 इंक्लुझिव्ह आले असून 8 जणांचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये उदगीरच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 75 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 60 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 12 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 03 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत.
उदगीर येथून 51 जणांचे स्वब तपासणी साठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 4 अहवाल प्रलंबित असून45 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
निलंगा येथून 23 जणांचे स्वब तपासणी साठी पाठविण्यात आले. त्यापैकी4 प्रलंबित तर 19 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा