कोरोना च्या पार्श्वभूमीवर २८ जुलै चा पुरस्कार सोहळा स्थगित.
एकुर्का रोड : व्यंकटेशजी चौधरी राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार २०२०
उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने जेष्ठ पर्यावरणवादी, शिक्षणमहर्षी स्व. व्यंकटेशजी चौधरी यांच्या स्मृती दिनी दिला जाणारा २८ जुलैचा राज्यस्तरीय पुरस्कार जागतिक महामारी कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्थगित करून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे प्रमुख प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी दिली.
प्रत्येक वर्षी शैक्षणिक, साहित्यिक पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या एका व्यक्तीला पंचवीस हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोना या विषाणू जन्य रोगाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सदरील पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा आयोजनाची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संयोजन समिती सदस्य पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. एन. आर. लांजे, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण यांनी दिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा