कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के.
एकुर्का रोड : उज्वल यशाची परंपरा कायम.
उदगीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी , मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५ : ७४ टक्के लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
विज्ञान शाखेतील एकूण ४८ विद्यार्थ्यांपैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हर्षदीप पारखे ४९५ गुण घेऊन प्रथम, प्रतिक्षा बिरादार ४८६ गुण घेऊन द्वितीय तर निकीता जाधव ही ४८० गुण घेऊन तृतीय आली आहे. कला शाखेत एकूण ८५ विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अंजली केंद्रे ५०० गुण घेऊन प्रथम, ज्योती जाधव ४९९ गुण घेऊन द्वितीय तर किरण पाटील ४९४ गुण घेऊन तृतीय आला आहे. एच.एस.सी.व्होकेशनल कोर्स मध्ये पूजा चिगळे५२२ गुण घेत केंद्रात प्रथम आली आहे. प्रणाली तेलंगे ५२१ गुण घेऊन द्वितीय आली आहे. तर अनिल जाधव हा ५२० गुण घेत तृतीय आला आहे. सर्व गुणवंतांचे संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी,पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, प्रा. एन. आर. लांजे, रसूल पठाण, संजय जाधव यांच्या सह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.