श्री हावगीस्वामीच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

श्री हावगीस्वामीच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन


   श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे मागच्या तीन महिन्यापासून अधून मधून टाळेबंदी चालू आहे. सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत.विविध माध्यमांच्या माध्यमातून अनेक जण साधक बाधक आपली मते मांडत आहेत.वर्तमान काळातील घडामोडीपासून साहित्याला देखील वेगळे करता येत नाही. साहित्यातील कविता हे अभिव्यक्तीचे एक प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोना काळातील घडामोडीवर अभिव्यक्तीसाठी विचारमंच तयार करून द्यावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
     सदरील स्पर्धा राज्यस्तरीय असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे.कवितेचा आशय हा कोरोना काळातील विविध घडामोडी संदर्भात अपेक्षित आहे.या काव्यलेखन स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.तरी विद्यार्थ्यांनी आपली कविता 82 75 93 97 35 / 99 22 96 65 26 या व्हाट्सअप क्रमांकावर 25 जुलै 2020 पर्यंत पाठवून द्यावी. कवितेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव, वर्ग व महाविद्यालयाचे नाव लिहावे. कवितेची भाषा मराठी असावी.
    राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.लोहारे,उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, मराठी विभागाचे प्रमुख व संयोजक डॉ. एस.वाय. चिमोरे,संयोजक डॉ.म.ई.तंगावार यांनी केले आहे.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही