सरदार वल्लभभाई पटेल शाळेत लॉयनेस क्लब गोल्डच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

सरदार वल्लभभाई पटेल शाळेत लॉयनेस क्लब गोल्डच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार


उदगीर: येथील लॉयनेस क्लब गोल्डच्या पदाधिकाऱ्यांचा सरदार वल्लभभाई पटेल शाळेत अभिजित औटे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 


यावेळी लॉयनेस क्लब उदगीर गोल्डच्या नुतन अध्यक्षा संगीता नेत्रगावे, सचिव दिपाली औटे, उपाध्यक्ष मंजुषा कुलकर्णी, कोषाध्यक्ष वर्षारानी धावारे, सह कोषाध्यक्ष अनुराधा धोंड, बोर्ड ऑफ डायरेक्ट प्रेमलता नळगीरे,लॉयझन ओफीसर उषा माने,पीआरओ राचम्मा मळभागे यांचा सत्कार करण्यात आला.


संस्थेचे अध्यक्ष नारायण देशपांडे, कार्यवाह अंबादासराव देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमाकांतराव बुधे, कार्यकारिणी सदस्य बाबुराव कुलकर्णी, कार्यक्रमाचे आयोजक मित्र मंडळ अध्यक्ष अभिजीत औटे यांचा हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी जयश्री स्वामी, रामेश्वर पटवारी, रोहीत पाटील, दत्तात्रय सकल यांची उपस्थिती होती.