अभय साळुंके यांच्या वतीने निलंग्यातील डाॅक्टर्स चा सत्कार
निलंगा : कोरोना महामारीच्या संकटात काळात सर्वजण लाॅकडाऊन असताना आपल्या जीवाची पर्वा न करता आहोरात्र जनतेच्या सेवेत असलेले शासकीय व खासगी डाॅक्टर्स यांचे मनोबल वाढवण्यासाठी बुधवार (दि १) रोजी डाॅक्टर्स डे च्या निमित्ताने काॅग्रेसचे युवानेते अभय साळुंके यांनी काॅग्रेस पक्षाच्या वतीने निलंगा शहरातील उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व खाजगी डाॅक्टर्स व त्यांच्या संपुर्ण स्टाफ चा सत्कार करुन ऋण व्यक्त केले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ दिलीप सौंदाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास कदम, डॉ सायगावकर, डॉ शाहुराज माकणीकर, डॉ शेषराव शिंदे, डॉ लालासाहेब देशमुख, डॉ तात्यासाहेब देशमुख, डॉ मल्लिकार्जुन कुडुंबले, डॉ सतिश पाटील, डॉ श्रीधर अहंकारी, डॉ नितीश लंबे, डॉ उद्धव जाधव, डॉ सतिश वडगावकर, डॉ गिरीधर सुर्यवंशी, डॉ साळुंके, डॉ प्रमोद हतागळे, डॉ किरण बाहेती, डॉ जगदाळे, डॉ बसुदे, डॉ गताटे, डॉ चांदुरे, डॉ राजेंद्र राठोड, डॉ राम रुपनर यांच्या हाॅस्पीटल मध्ये जावून त्यांच्या टिमचा सत्कार करुन कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स देत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. डॉक्टर्स डे निमित्ताने अभय साळुंके यांनी हाॅस्पीटल मध्ये येऊन सत्कार करत आडचणी जाणून घेतल्याबद्दल डाॅक्टर्सनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अजित निंबाळकर, शकील पटेल, गिरीष पात्रे, प्रमोद सुर्यवंशी, विजय होगले अदी उपस्थित होते .
addComments
टिप्पणी पोस्ट करा