भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी सुधाकर भालेराव


उदगीर: भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जाती मोर्चा च्या प्रदेश अध्यक्षपदी माजी आ. सुधाकर भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.


माजी आ. सुधाकर भालेराव यांनी सलग दोन टर्म उदगीर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विजय मिळविला आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना डावलले होते. त्यामुळे भालेराव हे नाराज असल्याचे बोलले जात होते. विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे भालेराव यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे ही चर्चिले जात असतानाच स्वतः भालेराव यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना पक्षातील दलालामुळे माझी उमेदवारी डावलले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे माजी आमदार भालेराव अजूनही पक्षातील नेतृत्वावर नाराज असल्याचे स्पष्ट होते.


दरम्यान आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. पक्षातील अनेक नाराज नेत्यांना स्थान मिळाले नाही पण माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यावर अनुसूचित जाती मोर्चा आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 


भालेराव यांना पक्षाचे राज्यपातळीवरील पद मिळाल्याने त्यांच्या स्थानिक विरोधकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. 


माजी आ. सुधाकर भालेराव यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, ऍड. सावन पस्तापुरे, आनंद बुंदे, शिवाजी भोळे आदींनी सत्कार करून अभिनंदन केले.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज