निलंग्यातील पहिल्या महिला गट शिक्षणाधिकारी शत्तारी शफीकाबानू अब्दुल शुकूर सेवानिवृत्त

निलंग्यातील पहिल्या महिला गट शिक्षणाधिकारी शत्तारी शफीकाबानू अब्दुल शुकूर सेवानिवृत्त


निलंगा  : येथील शिक्षण विभागात कार्यरत गेल्या एक वर्षापासून कामर्यरत असलेल्या पहिल्या महिला गट शिक्षणाधिकारी शत्तारी शफीकाबानू अब्दुल शुकूर 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्या कार्यकाळात त्यांनी निलंग्यातील शिक्षण क्षेत्रात एक आगळावेगळा ठसा उमटवला होता. या शहरातील शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या शत्तारी कुटंबीयांच्या स्नुषा आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील प्रशाले तून माध्यमिक शिक्षक पदावरुन केली.   


या निमित्त येथील पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या हस्ते त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय पोषण आहार अधिक्षक सचिन शिंदे व विस्ताराधिकारी संतोष स्वामी हे होते. 


 ताकभाते बोलताना म्हणाले की, शत्तारी यांना शिक्षणाचे अतुट नाते असल्याने त्यांना विद्यार्थ्याना शिकवताना एका वेगळ्या शैलीचा वापर केला. यातून विद्यार्थ्याना आजच्या युगातील शिक्षण घेताना सुलभता मिळाली त्या कायम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर भर देऊन समाजातील दिन दुबल्या परिवारातील मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. यामुळेच त्यांनी प्रशासनात काम करताना एक आगळावेगळा ठसा उमटवला आहे.


 या कार्यक्रमा वेळी विभागातील सर्व केंद्र प्रमुख, गटसाधन केंद्र कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पेशंनर असोशियन यांच्या वतिने उपाध्यक्ष तात्याराव धुमाळ, सचिव शत्तारी एस.ए.,कोषाध्यक्ष अनसरवाडकर डी.पी यांनीही सहपत्निक संत्कार केला. यावेळी सेवानिवृत्त झालेले केंद्र प्रमुख गोविंद बिराजदार व मुख्याध्यापक अदिनाथ कुंभार यांचाही सत्कार करण्यात आला. 


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज