रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चा अनोखा उपक्रम

रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चा अनोखा उपक्रम


उदगीर: उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल च्या वतीने दिनांक 27 जुलै ते 29 जुलै 2020 दरम्यान रोज संध्याकाळी पाच ते साडे सहा या वेळेत सुखी पालकत्व व हस्तकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.


या कार्यक्रमात दिनांक 27 जुलै रोजी संगमनेर येथील डॉ.संजयजी मालपाणी हे 'दोन शब्द आईसाठी; दोन शब्द बाबांसाठी' या कार्यक्रमात 'पालक म्हणून आपली जबाबदारी काय?' या विषयावर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शक्यतो मुले सोबत नसावीत.


दिनांक 28 जुलै रोजी मुंबई येथील प्रियाजी सुशांत शिंदे या 'यशस्वी पालकत्वाची गुरुकिल्ली' या विषयावर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.


दिनांक 29 जुलै रोजी सातारा येथील पर्यावरणप्रेमी सौ.गीताजी मामनिया या विद्यार्थ्यांना 'आपला बाप्पा आपण बनवा' इकोफ्रेंडली गणेश बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. 


सोलापूर येथील प्रसिद्ध हस्तकला प्रशिक्षक सौ नैनाजी बूब या 'विद्यार्थ्यांसाठी हस्तकला' याची कार्यशाळा घेणार आहेत.


हा कार्यक्रम सर्वांसाठी निशुल्क आहे, मात्र त्यासाठी https://forms.gle/mDKcV7w6sT9ADJ1h8 या लिंक वर क्लिक करून अथवा या 8485864454 या व्हाट्सअप क्रमांकावर नावनोंदणी करावी लागेल. त्यानंतर या कार्यक्रमाची फेसबुक लाईव्ह ची लिंक आपल्याला पाठवली जाईल. लॉकडाउनच्या काळात आपण सर्वांना सकारात्मक विचारसरणीसाठी प्रेरक, अशा या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चे अध्यक्ष रो. विशाल तोंडचिरकर,


सचिव रो. किर्ती कांबळे , प्रकल्प प्रमुख रो. व्यंकटराव कणसे यांनी केले आहे.


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image