सामाजिक समतेचे प्रणेते शाहू महाराज - बसवराज पाटील नागराळकर

सामाजिक समतेचे प्रणेते शाहू महाराज - बसवराज पाटील नागराळकर 
उदगीर : (दिनांक 26 जून)  सामाजिक न्याय, समता, बंधुता यासंबंधी शाहू महाराजांनी केलेले कार्य  भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंबित होते. प्रतिकूल परिस्थितीत कार्याची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजर्षी शाहू महाराज, असे उद्गार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी काढले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. 
               पुढे बोलताना नागराळकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी काळाच्या पुढे जाऊन समाजासाठी केलेले कार्य लक्षणीय आहे. सुख संपन्न अवस्थेत जीवन जगत असताना देखील राज्यातील प्रजेच्या दुःखाची असणारी जाणीव व त्या अनुरूप कृती ही शाहू महाराजांच्या कार्याची थोरवी आहे. आपणही शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्षात 'शिक्षक योद्धा' म्हणून कार्य करावे, असे आवाहन उपस्थितांना केले. याप्रसंगी प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी व्यासपीठावर सचिव प्रा. मनोहर पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बळीराम भुक्तरे यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा. डॉ. राजकुमार मस्के यांनी मानले. याप्रसंगी विद्यापीठ व शासकीय नियमाप्रमाणे प्राध्यापकांची उपस्थिती होती.