विजय निटूरे यांच्या जन्मदिनी रक्तदान शिबिर

विजय निटूरे यांच्या जन्मदिनी रक्तदान शिबिर


युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळी उदागिर महाराजांना वाढदिवसानिमित्त अभिषेक करण्यात आला.


येथील नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी राहुल आंबेसंगे, अमोल कांडगिरे, ईश्वर समगे, आदर्श पिंपरे, श्रीनिवास एकुरकेकर यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.