"हत्तीबेट महात्म्य"ग्रंथाचे नारकर महाराजांच्या हस्ते प्रकाशन
उदगीर--येथील लेखिका सुनंदा सरदार यांनी लिहिलेल्या"हत्तीबेट महात्म्य" या ग्रंथाचे प्रकाशन प.पुज्य. काशीनाथ नारकर महाराज यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील ढालगांव येथील स्वामी समर्थ संस्थानात गुरुवारी करण्यात आले.
"हत्तीबेट महात्म्य"हा ग्रंथ (पोथी) लेखिका सुनंदा सरदार यांनी सात अध्यायात लिहिली आहे. या ग्रंथात श्री.दत्तात्रेय, स्वामी समर्थ व सद्गुरू गंगारामबुवा महाराज यांच्या अवतार कार्याची महती व हत्तीबेट या पावन तीर्थक्षेत्राचे ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिक महत्व व भक्तांनाआलेली अनुभुती व या क्षेत्राचा विकास या विषयीचे लेखन या ग्रंथात करण्यात आले आहे.
या ग्रंथाचे प्रकाशन प. पु. नारकर महाराजांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात व्ही. एस. कुलकर्णी, मयुर कुलकर्णी व लेखिका सुनंदा सरदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना प. पूज्य नारकर महाराज म्हणाले की, हत्तीबेट महात्म्य या ग्रंथात हत्तीबेटाची महती ,दैवी संपदा व ऋषीमुनींनी केलेली तपश्चर्या या विषयी ओवीबद्ध स्वरूपात वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे हत्तीबेट तीर्थक्षेत्राचा महिमा वाढण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी ठरणार असल्याचे नारकर महाराज म्हणाले. कार्यक्रमास संस्थानचे पिराजी पाटील, नानासाहेब रुपनर,विश्वनाथ लवटे, शशिकांत पाटील,तात्याराव नरवटे, गहनीनाथ काळे, दादासाहेब डोंबाळे,सदाशिव शिंदे, बाबुराव जगताप यांची उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा