शेतकरी विरोधी विधेयक 2020 रद्द करा:  जिल्हा युवक काँग्रेसची मागणी

शेतकरी विरोधी विधेयक 2020 रद्द करा:  जिल्हा युवक काँग्रेसची मागणी...


लातूर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी विधेयक 2020 असंवैधानिक पद्धतीने मंजूर करून मुठभर व्यापार्यांचे हित साधणारा विधेयक सभागृहामध्ये मंजूर करून घेतला तरी हे विधेयक तात्काळ रद्द करून त्वरित विशेष अधिवेशन बोलावून सर्व संम्मतिने लोकशाही पद्धतीने विधेयक पारित करण्यात यावा व सबंध देशातील शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन महामहिम राष्ट्रपति भारत सरकार यांना उदगीर उपजिल्हाआधिकारी मार्फत देण्यात आले.


 यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.विजय राजेश्वरजी निटुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक काँग्रेस जिल्हासरचिटणीस श्रीनिवास एकुर्केकर यांच्या नेतृत्वखाली निवेदन देण्यात आले यावेळी उदगीर विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष श्री.अमोल घुमाडे,लोकभारती पक्षाचे श्री.अजित शिंदे,उदगीर विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्राध्यापक नागेश पटवारी,सद्दाम बागवान,आदर्श पिंपरे,अविनाश गायकवाड,महेश तोडकर, सतीश पाटील मानकीकर,ईश्वर समगे,एडवोकेट धम्मानंद कांबळे, प्राध्यापक जावेद शेख होनाळीकर,अरुण कांबळे दिपक जाधव इत्यादि युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज