निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात राजभाषा सप्ताह साजरा
निलंगा- महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा हिंदी विभागाच्या वतीने दि. १६ सप्टेंबर रोजी अत्यंत उत्साहात हिंदी राजभाषा सप्ताह कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी हिंदी विषयाचे युवा लघु कथाकार व आलोचक डॉ. ऋचा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या काळात जागतिक पातळीवर हिंदी भाषेचा विकास व विस्तार अत्यंत गतीने होत आहे परंतू देशातंर्गत शासकीय व राजकीय यंत्रणा मात्र हिंदीच्या विकासाबाबत निष्क्रिय दिसून येत आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना मात्र भाषेचा व राष्ट्रभाषेचा मनी अभिमान बाळगावा व या भाषेमध्येच आपले व्यवहार करावेत जेणे करुन भाषा विकसीत होण्यास मदत होईल असे अवाहन त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात योगिता शिरुरे, सुमय्या टप्पेवाले, प्रियंका अभंगे या विद्यार्थ्यांनीने राजभाषेसंदर्भात आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी हिंदी भाषेचे महत्व प्रतिपादीत केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, हिंदी विभागप्रमुख डॉ. बालाजी गायकवाड, डॉ. गोविंद शिवशेट्टे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आयोजन डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी केले तर आभार विद्यार्थीनी मेघा तुळसे यांनी केले.