श्री हावगीस्वामीत राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा
उदगीर : येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.एस.डी.लोहारे उपस्थित होत्या. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे, प्रा.डी.व्ही.बंडे, डॉ.यु.एस.धसवाडीकर, प्रा.एन.आर.हाके, प्रा.जे.के मुल्ला तसेच डॉ.म.ई.तंगावार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एन.आर.हाके यांनी केले . यावेळी डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि आवश्यकता सांगितली. महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी निमित्त ही राष्ट्रीय सेवा योजना सुरूवात करण्यात आली. आज भारतातील सर्व विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत असलेली पहावयास मिळते. राष्ट्रभक्तीची जाणीव एन.एस.एस.मुळे होते असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनराज बंडे यांनी केले. आभार प्रा.जे.के.मुल्ला यांनी मानले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा