पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विविध ठिकाणी अभिवादन

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना विविध ठिकाणी अभिवादन


उदगीर: जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहर व तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.


भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या निवासस्थानी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्या महाराष्ट्र प्रदेश, उदगीर तालुका, उदगीर शहर यांच्या वतीने घरावर पक्षाचे ध्वज आणि प्रतिमा पूजन करून आभिवादन करण्यात आले,


यावेळी नगर परिषद अध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, युवा नेते अमोल भालेराव, नगरसेवक मनोज पुदाले, राजकुमार मुक्कावर, शहाजी पाटील, गणेश गायकवाड, रामेश्वर पवार, आनंद बुंदे, भाजपा शहर अध्यक्ष उदय सिंह ठाकूर, पंचायत समिती सदस्य रामदास बेंबडे,वसंत शिरसे, जिल्हा उपाध्यक्ष गणराज जाधव, शंकर रोडगे, शिवशंकर धुप्पे, चंद्रकांत बिरादार


महिला मोर्च्यांच्या प्रदेश सदस्य उत्तरा कलबुर्गे, अल्पसंख्याक म. मोर्च्यांच्या शेख शन्नो, शहर अध्यक्ष मधुमती कनशेट्टे, उषा माने, अनिता बिरादार, शिवकर्णा अंधारे, कांता सूर्यवंशी, दीपा कोंगे, अरुणा बेलकोने, महादेवी पाटील, यांच्यासह नगर सेवक, महिला मोर्च्यांचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल निडवदे, नगरसेवक नागेश अष्टुरे, अमोल अनकल्ले, अमोल यलमटे, ओम मुंडे, श्रीकांत पारसेवार यांनी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहिली.


देवर्जन येथेही जनसंघाचे संस्थापक प्रखर हिंदुत्ववादी नेते अखंड हिंदुस्तानचे पुरस्कर्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.


तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे,जि. प. सदस्य उषा रोडगे, सतीश खरात, नारायण मिरगे, गंगाधर गरिबे, शंकर रोडगे, चेअरमन सूर्यकांत रोडगे, राम स्वामी कुसळकर, दत्ता खटके, तेजराव खटके, अंतेश्वर रोडगे, विश्वनाथ पंतोजी, नरसिंग सावंत, ईश्वर स्वामी, गंगाधर उगवणी, पुरगे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज