चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आर्थिक दुर्बल घटकांना अर्थसहाय्य
उदगीर: कोरोना व लॉकडाऊनच्या काळात आर्थिक दृष्ट्या डबघाईस आलेल्या कुटुंबाना चंदर अण्णा प्रतिष्ठानच्या वतीने 2,50,000 रुपयांचे राज्यमंत्री संजय बनसोडे साहेब यांच्या हस्ते पाच कुटुंबाला प्रत्येकी 50,000 रु.वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू. शंभुलिंग शिवाचार्य महाराज होते तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. संजयजी बनसोडे साहेब ,वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंदर अण्णा वैजापूरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते
बसवराज पाटील नागराळकर, उपजिल्हाधिकारी प्रविणजी मेंगशेट्टे साहेब, तहसीलदार व्यंकटेश मुंढे साहेब ,न.प.मुख्याधिकारी भारत राठोड साहेब, ग्रामीण पो.स्टे.पी.आय.वाघमारे साहेब,उद्योजक विमलताई गर्जे काकु,ज्ञानेश्वर पाटील,स्वीयसहायक महेश स्वामी,संदीप मोटेगावकर,सुनील केंद्रे,मदन पाटील, नागराज अंबेसंगे,शाम डावळे,समीर शेख ,नवनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्कार मुर्ती उदगीर
पं.स.नुतन सभापती शिवाजीराव मुळे, कोरोणा योध्दा डॉ. अनुप चिकमुर्गे व डॉ सुप्रिया चिकमुर्गे,लायन्स क्लब चे सचिव शिवम चणगे या सर्वाचे मंत्रीमहोदयाच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
सदरील कार्यक्रमास श्रीनिवास गर्जे, श्री गुंडप्पा पटणे सर,रमेश खंडोमलके, कल्याण बिरादार, केंद्र प्रमुख शिवशंकर पाटील साहेब, प्रल्हाद कारभारी,इच्छापुर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक श्री सिद्धेश्वर पटणे सर, रत्नगंगा केमिस्ट्री कोचिंग क्लासेसचे संचालक प्रदीप विरकपाळे सर, राजकुमार बिराजदार बामणीकर, अॅड सुनील रासुरे साहेब,दायमी सर,शंकर पाटील साहेब, सचिन वाघमारे सर, हरिश्चंद्र वट्टमवार, तुकाराम शिंदे सर, अजित फुलारी,अमोल घुमाडे, महादेव घोणे,प्रा.दत्ता खंकरे, तुळशीराम बेंबडे मामा,महादेव महाजन,बसवराज,मुन्ना सुर्यवंशी,मल्लिकार्जुन वारकरे, मुळे,उमाकांत सुंदाळे, अमोल पाटील,शिवसांब पाटील,बापुराव नराचे, संतोष सुर्यवंशी सर, विठ्ठलराव मुंडे ,ज्ञानोबा मुंडे ,धोंडीबा सुगावकर,मोरे,तानाजी जाधव, राजेंद्र सुगावे स्वामी,सय्यद सादिक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोतीराव लांडगे तर कार्यक्रमाचे आयोजन व आभार प्रदर्शन चंदरअण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.