*अंगणवाडी गुरधाळ येथे राष्ट्रीय पोषण महिना साजरा*
एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पोषण महिना या मोहिमे अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीत महिनाभर दररोज पोषण आहाराचे विविध उपक्रम राबविले जातात.
हे उपक्रम उदगीर तालुक्यातील आदर्श अंगणवाडी म्हणून जिल्हा परिषदेतर्फे सन्मानीत करण्यात आलेल्या गुरधाळ येथील अंगणवाडीत दररोज राबविले जात आहेत. दि.23/09/2020 रोजी फळे, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, डाळी इत्यादी चे प्रदर्शन भरवून त्याचे महत्व उपस्थित गरोदर माता, किशोरी मुली व पालक महिलांना पटवून देण्यात आले त्याच बरोबर गरोदर मातांचे पंजीकरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विस्तार अधिकारी सौ.एस.के. कलशेट्टे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षिका सौ.आशा सूर्यवंशी मॅडम, अंगणवाडी शिक्षिका सौ. नागिनबाई पटणे मॅडम, सौ.कविता बिरादार मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सौ.वर्षा बिरादार, सौ.राजकन्या गायकवाड, सौ.शिल्पा कांबळे, सौ.शीतल कांबळे,सौ.संगीता बिरादार, सौ.मोहिनी कारामुंगे, सौ.फुलाबाई पटवारी, सौ.वंदना कांबळे इत्यादी महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अंगणवाडी शिक्षिका सौ.नागिनबाई गुंडप्पा पटणे यांनी केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा