शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या: शिवशंभू संघटनेची मागणी
उदगीर : शिवशंभु संघटनेच्या वतीने खरीप हंगामात शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांना एकरी 25000/ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात शिवशंभु संघटने कडून करण्यात आली. या वेळी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख धनंजय पवार, तालुका अध्यक्ष विकास काळे, तालुका उपाध्यक्ष दयानंद डोंगरे,तालुका संपर्क प्रमुख तुषार बुलबुले, तालुका संघटक विक्रम पांचाळ, तालुका कार्याध्यक्ष गोविंद केंद्रे, तालुका सरचिटणीस दयानंद गायकवाड, तसेच संघर्ष गवळी, राम टपरे, बालाजी धुमाळ, मुकेश कांबळे, विशाल सदानंदे, व्यंकट आनकाडे, गणेश अश्टुरे व कार्यकर्ते उपस्थित होते