लॉकडावूनच्या काळात मानसने जपला चित्रकलेचा छंद: राजकारणी व्यक्तींच्या भाषणाच्या नकलाचीही आवड

लॉकडावूनच्या काळात मानसने जपला चित्रकलेचा छंद: राजकारणी व्यक्तींच्या भाषणाच्या नकलाचीही आवड


उदगीर: येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात 6 वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या मानस संजय देशमुख याने लॉकडाउनच्या काळात आपल्यातील असलेल्या चित्रकलेच्या छंदाला जोपासत ती कला अधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने काढलेल्या अनेक महापुरुषांच्या चित्रांबद्दल अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.


मानस संजय देशमुख हा लालबहादूर शास्त्री विद्यालयात सध्या 6 वी वर्गात शिकत आहे. गतवर्षी त्याने या शाळेत पाचवीच्या वर्गात लाल बहादूर शास्त्री विद्यालयात प्रवेश घेतला. रोज शाळेत जात असताना चित्रकला शिक्षक


महामुनी सर हे फलक लेखन करीत असताना तो त्यांच्याकडे निरखून पाहत असे. त्यांचे लेखन करण्याची शैली त्याला खूपच भावली. आज सरांनी काय फलक लेखन केले असेल यांचा तो विचार करत असतानाच यातूनच त्याला चित्रकलेची आवड निर्माण झाली. ही आवड जोपासण्यासाठी त्याला लोकडाऊन ही एक संधी सापडली. आणि या संधीचे सोने करीत मानसने लाॅकडाउनच्या काळात चित्र काढण्यास सुरुवात केली. त्याचे फलक लेखन पाहून पालकांकडून देखील त्याला प्रोत्साहन मिळत गेले. प्रारंभी छोट्या बोर्डावर नंतर त्याने पेपर वर चित्र काढायला सुरुवात केली. त्याच्यातील चित्रकलेतील आवड वाढीस लागण्यासाठी त्याला त्याच्या वडीलांचे (श्री संजय देशमुख) मार्गदर्शन मिळाले. आणि YouTube च्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या चित्रकाराचे चित्र पाहून मानसने आपली कला अधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रकलेसोबतच मानसला राजकारणातील नेते मंडळींच्या भाषणाची नक्कल करण्याची आवड आहे. या आवडीतून त्याने अनेक मान्यवर नेत्यांचे हुबेहूब आवाज काढून नकला करण्याचा प्रयत्न केला आहे. 


------------------- -


मानसला चित्रकला शिक्षक महामुनी सरांच्या लेखनातून प्रेरणा मिळाली शिवाय शाळेतील त्याचे शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन त्याच्यासाठी उपयोगी ठरले असल्याचे मानस देशमुख याची आई अश्विनी देशमुख यांनी सांगितले.


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image