मराठा समाजाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी एम. एम. जाधव
निलंगा : मराठा समाजाच्या हितासाठी सातत्याने लढणारे एम. एम. जाधव यांची मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सावित्री जिजाऊ व्याख्यानमाला राबविणे, रक्तदान शिबीर घेणे, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे अशा विविध सामाजिक उपक्रमात एम. एम. जाधव यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. यापूर्वी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी मराठा समाजाच्या विकासात योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन तानपुरे, डी. बी. बरमदे,यादव यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा