शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या केंद्रीय मंत्री दानवेंचे मुख्यमंत्र्याना आव्हान

शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या


केंद्रीय मंत्री दानवेंचे मुख्यमंत्र्याना आव्हान


निलंगा /प्रतिनिधीः- सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खरीप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौर्‍यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकसानभरपाई पोटी शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयेची मदत द्यावी अशी मागणी केली होती. ते आता स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी मागच्या पंधरा दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देवुन हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा शब्द पाळला असे आव्हान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.


           मागच्या पंधरा दिवसापूर्वी निलंगा मतदारसंघात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी रावसाहेब दानवे यांनी केली. यावेळी त्यांनी निलंगा येथील किशोर लंगोटे यांच्या शेतात पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. खरीपाच्या सुरुवातीलाच बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली आणि पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तीळ, तूर, मुग या पीकांचे संपूर्ण नुकसान झाल्याने आम्ही हतबल झालो आहोत अशी व्यथा शेतकर्‍यांनी दानवे यांच्या समोर मांडली. तेव्हा दानवे म्हणाले की एखाद्या भागात एका दिवशी 70 मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर तात्काळ प्रशासनाने अतिवृष्टीचे पंचनामे करून सरकारने तात्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी लागते. परंतु हे सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. नुकसान होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप पंचनामे झाले नाहीत हि शोकांतिका असुन तोंड पाहून पंचनामे करण्यापेक्षा सरसकट पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री संजय बनसोडे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज द्या असे सांगत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले राज्यमंत्र्यांनी नुकसानीची माहिती तहसीलदारांकडून घ्यावी अर्ज देण्याची काय गरज आहे असा प्रतिप्रश्न त्यांनी राज्यमंत्र्यांना केला.


       यावेळी माजीमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर, आ रमेश कराड, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, युवानेते अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जि.प सदस्य बजरंग जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, बापूराव राठोड , भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष शेषराव ममाळे, तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, शेतकरी मधुकर माकणीकर अदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा