• दहा वर्षानंतर गुरुजी झाले *साहेब* पारदर्शकपणे पदोन्नती:जि.प.लातूर   *जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांचे प्रमोशन*

• दहा वर्षानंतर गुरुजी झाले *साहेब*


पारदर्शकपणे पदोन्नती:जि.प.लातूर


 


*जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांचे प्रमोशन*


लातूर: शिक्षकांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नतीची दहा वर्षापासून रखडलेली प्रक्रिया पूर्ण करीत 12 गुरुजींना शिक्षण विस्तार अधिकारी होण्याची संधी जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली.याचबरोबर 55 शिक्षकांना समुपदेशनाने मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आल्याने शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.


लातूर जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिका-यांनी मागच्या सहा महिन्यात कोवीड काळ असूनही निर्णयप्रक्रिया गतिमान करीत विविध प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत.शिक्षकांमधून शिक्षण विस्तार अधिकारी निवडीची प्रक्रिया मागील दहा वर्षापासून प्रलंबित होती.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे ,उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सौ.भारतबाई साळुंके यांनी यासह मुख्याध्यापक निवडीची प्रक्रिया गतिमान करीत हा विषय मार्गी लावला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,शिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांनीही या प्रश्नाला वेग देत समुपदेशनसाठीचे नियोजन केले.त्यानुसार समुपदेशनाने 12 विस्तार अधिकारी व 15 मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात आली. कोणत्याही तक्रारीशिवाय ही पदोन्नती प्रक्रिया पार पाडल्याने शैक्षणिक वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज