जनतेच्या आशिर्वादामुळे माझा पुनर्जन्म --माजी आ सुधाकर भालेराव 


उदगीर 


पुणे , मुंबई येथे लाखो रुपये खर्चूनही न मिळणारी आरोग्य सुविधा आता उदगीर मधे मिळत असल्याने मी कोरोना बाधित झाल्या नंतर उपचार लाइफ केअर मधेच घेण्याचे ठरविले आणि हा विश्वास सार्थकी लागला. जनतेच्या आशिर्वाद आणि लाईफ केअर ची टीमने केलेले योग्य उपचार यामुळे माझा पुनर्जन्म झाला असल्याचे माजी आमदार सुधाकर भालेराव यानी सांगितले . 


 श्री भालेराव यांचा उपचारा नंतर लाईफ केअर येथे सत्कार करुन बुलढाणा अर्बन बँकेचे वाघ यांच्या हस्ते कोरोना योद्धा हे सन्मान पत्र


 देण्यात आले . गुरुवार ता.22 रोजी त्याना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्यानी नागरीकानी कोरोना झाला तर घाबरुन न जाता लाईफ केअर हॉस्पिटल मधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि अनुभवी डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाने आजारा पासुन मुक्त व्हावे असे आवाहन केले . 


     ईतर आजार अर्थात कोरोना नसलेल्या नॉन कोविड रुग्नासाठी स्वतंत्र आय सी यू , स्वतंत्र नर्सिंग कर्मचारी , स्वतंत्र वार्ड़ अशी व्यवस्था करण्यात आली आहे . गरजू रुग्नासाठी महात्मा फ़ुले जन आरोग्य योजने आंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे श्री भालेराव यानी सांगितले .


    यावेळी सी एफ ओ अमोल भालेराव , डॉ ज्ञान विकास , डॉ शिवराज सुर्यवंशी , मिलिंद घनपाठी , 


डॉ श्याम हिबाने , राजगोविंद कारभारी , किरण पाटील यांच्यासह हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स , आणि कर्मचारी उपस्थीत होते.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज